Ad will apear here
Next
‘भेटली तू पुन्हा’चे मोशन पोस्टर प्रदर्शित!
कोल्हापूर : काही व्यक्ती, काही जागा आपल्याला प्रथमदर्शनी क्लिक होत नाहीत; पण मग कालांतराने सहवासातून आपुलकी निर्माण होते आणि मग नकळत प्रेम! पहिल्या नजरेत होणाऱ्या प्रेमापेक्षा सहवासातून उमलत जाणारं प्रेम जास्त गहिरं आणि हळवं असतं. हे साधं सरळ इक्वेशन असतं; पण तरी ते भल्याभल्यांना लवकर उमगत नाही. आधी आपल्या अगदी समोर असलेल्या गोष्टी आता आपल्याला हव्याहव्याशा वाटू लागतात. प्रेमाची नवी परिभाषा दाखवणारा, स्वरूप रीक्रिएशन अँड मिडिया प्रा. लि. निर्मित आणि चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर हेच जादुई इक्वेशन सोप्या पद्धतीने सोडवून दाखवत आहे.

बोलके शब्द आणि मुक्या भावना व्यक्त करणाऱ्या कवितेच्या ओळी, वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांची जोडी, ‘डीडीएलजे’ची आठवण करून देणारा रोमँटिक असा ट्रेनचा प्रवास या सगळ्या कारणांमुळे या मोशन पोस्टरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक प्रेक्षकांनी हे मोशन पोस्टर पाहिले आहे.
 
असा हा प्रेमाच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणारा ‘भेटली तू पुन्हा’ हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WYZZBD
Similar Posts
‘शेंटिमेंटल’चा ‘टीझर’ प्रदर्शित कोल्हापूर : ‘पोस्टर बॉइज’ आणि ‘पोस्टर गर्ल’मुळे हसता हसता ‘सेंटिमेंटल’ करणारा लेखक आणि दिग्दर्शक अशी समीर पाटील यांची ओळख झाली आहे. अशोक सराफ यांना दिलेल्या पोस्टररूपी आगळ्यावेगळ्या शुभेच्छांमुळे त्यांच्या नवीन ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. आता नुकत्याच प्रदर्शित
‘शेंटीमेंटलमुळे’ महाराष्ट्र होणार हसून हसून ‘मेंटल!’ कोल्हापूर : ‘पोस्टर बोइज’ आणि ‘पोस्टर गर्ल’ या धमाल ‘मॅड कॉमेडी’ चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्र गाजवल्यानंतर समीर पाटील आता ‘शेंटीमेंटल’ या नवीन चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना हसून हसून मेंटल बनवायला सज्ज झाले आहेत. सामाजिक प्रश्नांवर विनोदी शैलीत भाष्य करणारा दिग्दर्शक अशी समीर पाटील यांची ओळख झाली आहे
‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या ‘डीकेटीई’ संस्थेला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये बेस्ट प्लेसमेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डीकेटीई’च्या वतीने एमबीए विभागप्रमुख प्रा. एस. आर. पाटील यांनी डॉ. रवी गुप्ता आणि कमिशनर डॉ
कमला महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण कोल्हापूर  : पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर’च्या सहकार्याने येथील कमला महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले. या वेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, रोटरीचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language